‘ते पन्नास दिवस’ : ही कादंबरी काय सांगते, ते महत्त्वाचे आहेच; परंतु ती जे काही सांगत नाही, ते जास्त महत्त्वाचे आहे
ही कादंबरी रस्त्यावर उभी राहते आणि कुटुंबसंस्था, जातीसंस्था, विवाहसंस्था, नोकरशाही, इतिहास, भूगोल मापत राहते. कायदा-सुव्यवस्था आणि आरोग्य यांच्यामध्ये स्वभावत:च असणारा दुजाभाव रेखांकित करते. कायदे मोठे की माणसे, हा मोठा अवघड प्रश्न उभा करते. ५० दिवसांचा दैनंदिन क्रम यात असला तरी ती पन्नास वर्षे मागे जाते आणि आपल्याला यापुढील ५० वर्षं चटके सहन करावे लागतील, हेही अधोरेखित करते.......